Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

Pune-Mumbai Expressway Closed For Heavy Vehicle: मराठा आरक्षण मोर्चामुळे ( Maratha Reservation Morcha) कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चा एक्स्प्रेस वेऐवजी जुना पुणे-मुंबई महामार्ग (Pune-Mumbai Expressway) निवडणार आहे. तथापि, खंडाळा घाट विभागात सहा किलोमीटरचा रस्ता आहे ज्याचा वापर द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग दोन्ही वाहतुकीसाठी सामायिक मार्ग म्हणून करतात. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे परिणाम टाळण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कॉरिडॉरवर अवजड वाहनांना मर्यादा घालण्यात येत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मराठा आरक्षण मोर्चाची मिरवणूक खंडाळा घाट परिसराच्या पलीकडे जात असताना, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून निघणारी मोठी वाहने एक्स्प्रेस वेच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून त्यांना हळूहळू पुढे जाण्यास परवानगी दिली जाईल. तथापि, पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहने अद्यापही मुंबई-ते-पुणे एक्स्प्रेसवे मार्गाचा वापर करू शकतात. (हेही वाचा - Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Accident: समृद्धी एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठा अपघात; मरावतीमधील तळेगाव-दशासरजवळ टूरिस्ट बस ट्रकला धडकल्याने तिघांचा मृत्यू, 15 जखमी)

द्रुतगती मार्गावर हलक्या मोटार वाहनांच्या कोणत्याही दिशेला जाण्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात येणार नाही. महामार्ग राज्य पोलिसांच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. बाहेर पडण्याचे मार्ग अवरोधित केले जातील आणि या ठिकाणी बॅरिकेड्स लावले जातील. (हेही वाचा - Maratha Reservation protest: आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस)

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईत मोर्चा काढणार आहे. आता हा मोर्चा मुंबईच्या जवळ पोहोचला आहे. आज वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा होणार आहे. तथापी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.