पिंपरी-चिंचवड: सासूची ब्लाउजने गळा आवळून हत्या, सख्ख्या मुलासह पत्नी ठरली गुन्हेगार
Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे (Pune) येथील तळेगाव मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार एका सुनेने सासूची ब्लाउजने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐवढेच नव्हे तर या घटनेत सुनेला मृत महिलेच्या मुलाचा सुद्धा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. तसेच मृतदेह ते शेजारच्या झाडाझुडपात फेकून देत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मुलगा आणि पत्नी यांना अटक करण्यात आली आहे.(Nagpur Rape: खळबळजनक! नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवत एका तरूणीवर वारंवार बलात्कार, नागपूर येथील घटना)

पूजा आणि मिलिंद शिंदे असे आरोपींचे नाव आहे. तर बेबी शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. तर पूजा आणि बेबी यांच्यामध्ये लहानसहान गोष्टीवरुन नेहमीच घरात वाद व्हायचे. भांडण झाल्यानंतर बेबी शिंदे या त्यांच्या मुलीकडे जात असत आणि चार-पाच दिवसांनी पुन्हा घरी येत. तर 21 मे रोजी दीर कामावर गेल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. त्यांच्यामधील वाद ऐवढ्या टोकाला गेला की, सुनेने सासुचा ब्लाउजने गळा आवळला तेव्हाच बेबी यांचा मृत्यू झाला.

या घटने बद्दल जेव्हा मिलिंद याला कळले असता त्याने आपल्या पत्नीची बाजू घेतली. तर मृतदेहाचे नेमके काय करावे यासाठी त्याने मृतदेह पोत्यात भरुन आधी टेरेवर ठेवसा. तर थोडाथोडा वेळाने घराच्या आजूबाजूला कोणी आहे का याकडे लक्ष दिले. अखेर त्यांनी घरातून पोत्यात भरलेला मृतदेह शेजारीच असलेल्या एका झाडाझुडपात टाकला.(Nanded Suicide: एका तरूणाचे विवाहित महिलेशी जुळले प्रेम; कुटुंबियांच्या विरोधामुळे दोघांची गळफास लावून आत्महत्या)

परंतु घटनेच्या दोन दिवसांनी गुन्ह्याचा खुलासा झाला. तेव्हा मुलगा आणि त्याच्या बायकोनेच आईचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले. ही बाब कळल्यानंतर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे.