MHADA Pune Lottery 2019: खुशखबर! उद्या निघणार MHADA च्या 4,756 घरांची ऑनलाईन सोडत; घरबसल्या इथे पाहू शकाल
म्हाडा (Photo Credits-Facebook)

मार्चमध्ये म्हाडाच्या (MHADA) पुणे (Pune) येथील घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणज 7 जून रोजी, 4,756 घरांची ऑनलाईन सोडत निघणार आहे. या घरांसाठी एकूण 41,501 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यामुळे नक्की कोणाच्या नशिबात ही घरे आहेत याचा फैसला उद्या होणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, समरजितसिंह घाटगे आणि मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत सकाळ 10 वाजता, अल्प बचत भवन येथे ही सोडत निघणार आहे.

म्हाडाच्या पुणे विभागात, सातारा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात 4,756 घरे आहेत. 1 आरके, 1 बीएचके, 2 बीएचके आणि रो हाउस अशी ही घरे आहेत. समाजातील दुर्बल आणि गरजूंना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध होणार आहेत. ज्या लोकांना ही घरे प्राप्त होतील त्यांना एसएमएस द्वारे कळवण्यात येणार आहे. सोडतीची प्रक्रिया आणि निकालाचे वेबकास्टिंग, केले जाणार असल्याने, घर बसल्या तुम्ही ते पाहू शकता. (हेही वाचा: म्हाडा: एक व्यक्ती, एक घर, एक कुटुंब; तब्बल 83 अर्ज)

चार जिल्ह्यांमधील ही सोडत निघाल्यानंतर येत्या काही दिवसांत, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 4,744 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. 4,756  घरांपैकी 1662 घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील, 2237 घरे म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील तर सरकारच्या 20 टक्के सर्व समावेशक योजनेसाठी 857 घरे आहेत. सोडतीची प्रक्रिया संपूर्ण मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहे.

इथे पाहू शकाल निकाल -

यू ट्यूब लिंक - http://bit.ly/punemhada_live2019

वेबसाईट - www.mhada.maharashtra.gov.in

www.mhada.gov.in

http://lottery.mhada.gov.in

या सोडतीमध्ये घरे प्राप्त झालेल्या अर्जदारांनी कॅनरा बँकेमध्ये पात्रतेची कागदपत्रे 6 जुलै पर्यंत प्रत्यक्ष अपलोड करायची आहेत.