MHADA | Photo Credits: File Photo

पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न सर्व सामान्यांच्या आवाक्यामध्ये आणण्यासाठी आता पुणे हाऊसिंग मंडळ अर्थात पुणे म्हाडा पुन्हा सज्ज झाली आहे. यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत 2 हजार घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. एका न्यूज पोर्टलच्या माहितीनुसार, पुणे म्हाडाचे सीईओ नितीन माने पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली असून लवकरच अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.

पुणे म्हाडाने मागील वर्षी जानेवारी 2020 मध्ये 5657 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. आता त्यापाठोपाठ पुण्यामध्ये पुन्हा 2 हजार घरांची सोडत म्हाडा कडून जाहीर करण्यात येणार आहे. म्हाडा पुणे विभागामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर या शहरांमध्ये मिळून सुमारे 2 हजार घरांसाठी सोडत जाहीर करणार आहे. या प्रकल्पामध्ये 600 सदनिका आणि उर्वरित 20% घरं बिल्डरकडे असतील.

पुण्यामध्ये दीड हजार घरं ही पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डरांनी बांधलेल्या स्किम मधील असतील. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये ती उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे असे देखील नितीन माने पाटील म्हणाले आहेत. Jitendra Awhad PC:  टाटाच्या कॅन्सर रुग्णांसाठी MHADA ने हस्तांतरित केली मुंबईतील काही घरं; जितेंद्र आव्हाड यांनी केली मोठी घोषणा.

मागील वर्षभर कोरोना संकटकाळात अनेकांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे गरीब, आर्थिक दुर्बल घटकांचं घर  घेण्याचं स्वप्न पुन्हा त्यांच्या आवाक्यामध्ये आणण्यासाठी म्हाडा हा प्रयत्न करत आहे. दरम्यान मागील 2-3 वर्षांपासून सातत्याने म्हाडाकडून पुणे विभागात घरं उपलब्ध करून दिली जात आहेत.