Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज सकाळी ट्विटच्या माध्यमातून एक गौप्यस्फोट केला. अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी भाजप सोबत राहावे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर काही वेळापूर्वी आव्हाडांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 'रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या भाजपच्या एजंट होत्या' असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर अधिका-यांना ओळखण्यात आम्ही कमी पडलो असे सांगत आमची चूक झाली असेही ते यावेळी म्हणाले. तसचे यापुढे कुणाची चूक झाली की शिरच्छेद करणार असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

त्याचबरोबर "फोन टॅप करणे हे नियमबाह्य असून हे मानवी विकृती आहे" असेही ते म्हणाले. रश्मी शुक्लांनी कायद्याचे उल्लंघन केले असे सांगत योग्य ते पुरावे हाती आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.हेदेखील वाचा- Maharashtra: अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजप सोबत राहण्यासाठी रश्मी शुल्का यांनी धमकावल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

"रश्मी शुक्लांनी पैशाची ऑफर केली. तसेच ते कोणासाठी काम करत होत्या हे शोधून काढायचे आहे. कारण ही आता व्यक्तिगत लढाई नाही" असेही आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले. आम्ही मोठ्या मनाने माफ केले ही आमची चूक झाली अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. कॅन्सर रुग्णांसाठी (Caner Patients) म्हाडाचे (Mhada) 100 फ्लॅट टाटा रुग्णालयासाठी (Tata Memorial Hospital) देणार अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. हे फ्लॅट हाजी कासम इमारतीतील असतील असेही ते म्हणाले. तसेच एकदा का हे फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला दिले तर त्यातील निर्णयावर म्हाडा हस्तक्षेप करणार नाही असेही ते म्हणाले.