Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात; पुण्यात करणार रोड शो
Photo Credit - x

Pune Loksabha: पुण्यामध्ये काँग्रेसने आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपने मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच तिकीट दिल आहे. त्यामुळे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असताना आता रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच प्रियांका गांधी(Priyanka Gandi)ही मैदानात उतरणार आहेत. (हेही वाचा : Ravindra Dhangekar लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या भेटीला (Watch Video))

पुण्यात आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचे मोठे आव्हान आहे. त्याशिवाय, नुकतेच मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले वसंत मोरे हे देखील लोकसभेत त्यांचं नशिब आजमावत आहेत. त्यांचेही कडवे आव्हान धंगेकर यांना पेलावं लागणार आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत.

लवकरच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह प्रियांका गांधी, आणि आदित्य ठाकरे पुण्यात रोड शो करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची देखील पुण्यात सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.