Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, 21 वर्षीय तरुणाची हत्या
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) पुन्हा एकदा कोयता गँगची (koyta Gang) दहशत पुन्हा वाढली आहे. पुण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वाघोली (Wagholi) येथील एका महाविद्यालयमध्ये तो शिकत होता आणि  तेथे एका होस्टेलमध्ये राहत होता. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले.  (हेही वाचा - भारत गौरव ट्रेन मध्ये 40 प्रवाशांना विषबाधेचा संशय; पुणे स्थानकात उपचारानंतर सारे ससून रूग्णालयात दाखल)

दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर सदर जखमीस रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु त्याला ससून रुग्णालयात पुढे पाठवण्यात आले ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हा युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता आणि एका होस्टेलमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासा दरम्यान समोर ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे.

पुणे  शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही  ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता.  पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून  खून केला होता.