चैन्नई कडून मुंबई कडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये (Bharat Gaurav Train Food Poisoning) प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. सार्यांना पुण्याच्या ससून हॉस्पिटल (Sasoon Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रवाशांची स्थिती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अन्नातून या 40 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.
भारत गौरव ट्रेन मध्ये प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. स्टेशन वरच स्टाफ आणि डॉक्टरांचे पथक दाखल होते. 40 प्रवाशांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्नातून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे जात असला तरीही या बाबत अधिक तपास आता रेल्वे प्रशासन करत आहे. Bharat Gaurav Train: पुणे येथून 22 जून रोजी सुरु होणार नवी भारत गौरव ट्रेन; घडणार उत्तर भारतातील लोकप्रिय ठिकाणांचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर .
चेन्नई वरून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा, एकूण 40 प्रवाशी बाधित#news18marathi pic.twitter.com/tSMYNOJvZC
— News18Lokmat (@News18lokmat) November 29, 2023
रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रेल्वेतील खाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. भारत गौरव ही ट्रेन रेल्वेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी म्हणून सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनद्वारे भारतातील तीर्थक्षेत्रांना जोडण्यात आलं होतं. प्रवासी या ट्रेन द्वारा दक्षिण भारतामध्ये रामेश्वर, मिनाक्षी मंदिर, बालाजी मंदिर यांना भेटी देऊ शकतात.