Accident (PC - File Photo)

Pune Road Accident: पुण्यातील कात्रज परिसरात  कोंढवा रस्त्यावर तब्बल 11 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या विचित्र घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात एका नागरिाकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि 5जणांना गंभीर जखमा झाल्या आहे. या अपघातात स्कूलबस, ट्रक यांची जोरात धडक झाल्याचे समोर आले आहे. कोंढवा बुद्रुक येथील स्मशनाभुमी जवळ सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीसांच्या गाड्या आणि रुग्णसेविका दाखल  झाल्या आहेत.

या भीषण अपघातात  स्कूल बसची जोरदार धडक ट्रकला लागली. स्कूलबसाचा समोरील भागाचा चेदांमेदा झाला. सुदैवाने बसमध्ये कोणतीही जीवहानी झाली नाही. दोन शाळकरी मुलांना किरकोळ जखम झाल्याचे समजले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या भीषण अपघातामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. पोलीसांनी ग्रस्त वाहनांना बाजूला केले आहे.

या घटनेत 5 जणांना गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासकिय रुग्णालयाता त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे. या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव अद्यापही समजू शकले नाही. पोलीसांकडून पंचनामा करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.