Poddar School Bus: अखेर 'ती' पोद्दार स्कूलची हरवलेली बस सापडली, पोलिसांकडून अधिक तपास सुरू
School Buse | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com

मुंबईतील सांताक्रूझ (Santa Cruz) परिसरातून विद्यार्थ्यांसह स्कूल बस बेपत्ता (School Bus Missing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझमधील पोद्दार स्कूलची (Poddar School) ही बस होती.दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र, सायंकाळी पाच वाजले तरी विद्यार्थी घरी पोहोचले नव्हते. यामुळे पालकांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता ही बस नेमकी कुठे होती याचा पत्ता लागला असून सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्कूल बसचा चालक याचा फोनही स्विच ऑफ होता.

तर या शाळेच्या या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप शाळेकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नव्हती. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यातही धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवली आणि तपास सुरू केला आहे. हेही वाचा Nagpur: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून अचानक निघाला धूर, पायलटला समजताच नागपूरात केले इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे. अशी आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.