Pune Hit And Run Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Hit And Run Accident Video: आलीशान पोर्श कार बेदरकारपणे हाकत अल्पवयीन आरोपीने दोन पादचाऱ्यांना चिरडल्याच्या (Pune Porsche Accident) घटनेने पुणे शहर आगोदरच हादरले आहे. या प्रकरणामुळे समाजात निर्माण झालेला संताप कायम असतानाच पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना याच शहरात घडली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Accident) शहरातील हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील भुजबळ रस्त्यावरील आहे. ही घटना 23 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, भरधाव वेगाने आलेली कार रस्त्यावर उभा असलेल्या तरुणीला धडक देते. प्राप्त माहितीनुसार ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे तरुणी जवळपास 20 फूट उंच हवेत उडाली.

हिंजवडी हिट अँड रन प्रकरणात अद्याप कोणालाही अटक नाही

हिंजवडी परिसरात घडलेल्या या अपघातातील पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हिट अँड रन प्रकारातील हे प्रकरण आहे. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीला रुग्णालयातही दाखल केले. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. तसेच, कोणासही अटक झाली नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करु असे पोलिसांचे म्हणने आहे. (हेही वाचा, Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरपीच्या वडिलांसह चौघांवर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल)

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

पुणे येथील कल्याणीनगर परिसरात पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई आई शिवानी अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यांच्यासह अशफाक मकानदर यांना अटक झाली आहे. या सर्वांना येत्या 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील अग्रवाल कुटुंबातील सदस्यांना मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा तर मकानदार याच्यावर आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. या सर्वांना कोठडी संपल्यावर कोर्टासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली. हे प्रकरण 19 मे रोजी घडले. ज्यामध्ये अल्पवयीन मुलगा विनाक्रमांकाची पोर्श कार बेदरकारपणे हाकत होता आणि त्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांना धडक दिली. ज्यामध्ये दोघांचे हाकनाक प्राण गेले. (हेही वाचा, Pune Porsche Accident Updates: पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे हॉटेल बुलडोझरने जमीनदोस्त)

नागपूरमध्येही हिट अँड रन प्रकरण, सून उठली सासऱ्याच्या जीवावर

दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही हिट अँड रनचे प्रकरण घडले आहे. या प्रकरणात भरधाव कारने 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चिरडण्यात आले. धक्कादायक म्हणजे हे प्रकरण हिट अँड रनचे नसून संपत्तीच्या हव्यासापोटी केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेऊन प्रशासकीय अधिकारी असलेल्या सुनेनेच सासऱ्याचा सुपारी देऊन काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. या प्रकरणात सून असलेली आरोपी अर्चना पुट्टेवार हिला अटक करण्यात आली आहे.

व्हिडिओ

धक्कादायक म्हणजे अर्चना या गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक आहेत. तिने आपल्या पतीच्या वाहन चालकालाच सुपारी देऊन सासऱ्याचा काटा काढण्यास सांगितले. धक्कादायक म्हणजे या प्रकरमआत 17 लाख रुपये आगोदरच अनामत रक्कम म्हणून दिले होते. तर उर्वरीत रक्कम काम झाल्यावर मिळणार होते. त्यानंतर चालकाने आणखी काही साथीदारांच्या मदतीने बालाजी नगर परिसरात 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना गाडीखाली चिरडले. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.