Pune Crime: पुण्यात मागील काही दिवसांपासून हत्येची मालिका सुरुच आहे. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान चोरीच्या संशयावरून एका तरुणांने महिलेचा खून केला आहे. या घटनेनं पुन्हा पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगत आहे.शहरातील बुधवार पेठेत ही घटना घडली आहे. (हेही वाचा- कर्नाटकातील कोप्पलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला मारहाण;)
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा थोरात असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. वर्षांवर काठीने मारहाण केल्याने तीचा मृत्यू झाला. अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले असं आरोपींचे नाव आहे. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वीच अब्दुलचा मोबाईल चोरीला गेला होता तर हा मोबाईल वर्षाने चोरी केल्याचा संशय त्याला आसा. त्यानंतर गौरवने वर्षाला मोबाईल संदर्भात विचारणा केली होती पण त्यांच्यात यावरून वाद झाला.
वादात गौरवने वर्षाच्या डोक्यात काठीने मारलं. या घटनेती ती जखमी झाली आणि जमीनीवर कोसळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वर्षाने जीव गमावला. तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती फरासखान पोलिस ठाण्यात देण्यात आली माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी आले आणि दोन आरोपीला अटक केले आहे.