महाराष्ट्र विधानसभा निवडूक 2019: अरे व्वा! 102 वर्षांच्या मतदाराने केले मतदान; रुग्णालयात उपचार घेत असतानाही बजावले कर्तव्य
Maharashtra Assembly Election (Photo Credit: ANI)

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. या निमित्ताने प्रत्येक नागरिक जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपला अधिकार (Voting) बजावत आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे, असे सरकारकडून वारंवार आवाहन केले जाते. एवढेच नव्हेतर, सरकारकडून मतदानाचे महत्वही पटवून दिले जाते. परंतु, तरुण वर्ग मतदानाच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. यातच पुणे (Pune) शहरातील 102 वर्षीय जेष्ठ नागरिकांनी मतदान करून तरुणाला लाज वाटेल असे कृत्य करुन दाखवले आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात मतदान सुरु आहे. जेष्ठ नागरिक हाजी इब्राहिम अलीम जोड यांचे वय 102 असून त्यांनी लोहगाव मतदारसंघात जाऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. एवढेच नव्हेतर, जोड यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेल्या चार दिवसांपूर्वी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडत असून त्यांना मतदान करुन आपले हक्क बजावयाचा आहे, असे जोड यांनी कुटुंबियांना सांगतले. मतदान प्रत्येक नागरिकांचे हक्क आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यावेळी ते म्हणाले की, मी आपल्या कुटुंबासमवेत प्रत्येकवेळी मतदान करतो. मला चार दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज मी मतदान करण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर सर्व नागरिकांनी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: वेंगुर्ले तालुक्यातील मतदार भडकले; कपाटाला दिलेले मत सिलेंडर निशाणीला गेल्याचा आरोप

एएनआयचे ट्विट-

राज्यात अनेक ठिकाणी नागरिक मतदानाला महत्व देत नसल्याचे आढळून आले आहे. मतदान हे नागरिकांचे केवळ हक्क नसून कर्तव्यही आहे, अशी सरकारकडून जनजागृती केली जाते.