प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि पुणे महापालिकेतील रस्ते विभागाचे उपअभियंता विठ्ठलराव सोनावणे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेला महिनाही उलटला नाही, तोच आणि पुण्यातील गट शिक्षण अधिकाऱ्याला लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. आरटीईमार्फत (RTE) शाळेत प्रवेश देण्यासाठी या अधिकाऱ्याने तब्बल 50 हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

रामदास वालझडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आरटीई मार्फत प्रवेश देण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. यासबंधित संबंधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रामदास वालझडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांना अटक झाल्याचे समजत आहे. हे देखील वाचा-Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, पुणे महानगरपालिकेच्या खाजगी रुग्णालयांना महत्वाच्या सूचना

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली होती. या घटनेला एक आठवडा उलटला नाही, तोच पुणे महानगरपालिकेतील रस्ते विभागाचे उपअभियंता लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग हाथ पकडले होते. याप्रकरणी आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.