कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ( Covid-19 Third Wave)ओळखून मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. याच पाठोपाठ पुणे महानगरपालिकेनेही (Pune Municipal Corporation) खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्राद्वारे महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिका खाजगी रुग्णालयातील बेड कधीही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णालयाने तयारीत राहावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या दोन लाटांमध्ये खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेतले होते. सध्या खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याची महापालिकेने तयारी ठेवली आहे. यांपैकी 10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात यावेत, अशा सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी आणि उपचारासाठी नकार न देता त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. ज्यामुळे उपचारासाठी विलंब होणार नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे. हे देखील वाचा- Pune Water Supply Update: पुणे शहरात 2 सप्टेंबरला पाणीपुरवठा बंद, 3 सप्टेंबरला कमी दाबाने पुरवठा; पालिकेची माहिती
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवारी (5 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता माझा डॉक्टर ई-वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे.