WhatsApp Group Pune | (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Crime: पुणे शहरालगत असलेल्या फुरसुंगी (Fursungi) येथे धक्कादायक घटना घडली आहे. व्हाॅटसअप ग्रुपमधून (WhatsApp Group Pune) काढल्याच्या रागातून एका व्यक्तीने साथीदारासह सोसाटीच्या अध्यक्ष असलेल्या महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. केवळ मारहाणच नव्हे तर आरोपींनी पीडित व्यक्तीची जीभही कापल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाणे दप्तरी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रिती किरण हरपळे (वय-38) यांनी यांनी या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश किसन पाेकळे, सुयाेग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार अशी आरोपींची नावे असल्याचे समजते. (हेही वाचा, WhatsApp New Feature: कॉल अलर्ट बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर)

घटनेबाबत माहिती अशी की, पुण्यातील फुरसुंगी येथे ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था नावाची साेसायटी आहे. तक्रारदार असलेल्या प्रिती हरपळे यांच्याकडे सोसायटीचे अध्यक्षपद आहे. आरोपी आणि तक्रारदार एकाच सोसायटीचे रहिवासी आहेत. दरम्यान, सुरेश पाेकळे यांना सोसायटीच्या ग्रुपमधून कथीतरित्या काढून टाकले. यावर पोकळे यांनी अध्यक्ष असलेल्या प्रिती हरपळे यांचे पती किरण हरपळे व्हाटॅसअपवरुन मेसेज केला. तसेच, ‘तुम्ही मला ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा जाब विचारला. यावर हरपळे (किरण) यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही.

प्रकरण केवळ जाब विचारुन मिटले नाही. पाेकळे यांनी हरपळे यांना फाेन केला व मला आपणास भेटायचे आहे असे सांगितले, यावर हरपळे यांनी पोकळे यांना सोसायटीच्या कार्यालयात बोलावले. तिथेही पोकळे यांनी हरपळे यांना जाब विचारला. यावर ग्रुप सोसाटीच्या सदस्यांचा आहे. पण लोक काहीही मेसेज टाकतात. त्यामुळे ग्रुपच बंद केला आहे असे सांगितले. पण पोकळे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हरपळे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोकले यांच्यासोबत आलेल्या इतर चारपाच इसमांनीही हरपळे यांना बेदम मारहाण केली. यात हरपळे यांना बेदम मार बसला असून, त्यांची जीभही तुटल्याचे समजते. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. तपास अद्यापही सुरुच आहे.