WhatsApp New Feature: कॉल अलर्ट बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवी फिचर्स घेऊन येते. आताही व्हॉट्सअॅप अशाच प्रकारचे एक नवे फिचर घेऊन आले आहे. जे युजर्सला नोटीफिकेशन्सबाबत अधिक सक्षम पर्याय उपलब्ध करु देऊ शकते.

WhatsApp New Feature: कॉल अलर्ट बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर
WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेला मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp एक नवे वैशिष्ट्यपूर्ण फिचर आनत आहे. जे युजर्सला कॉल विंडोज बीटावरील कॉलसाठी नोटीफीकेशन्स डिसेबल करण्यास अनुमती देते. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट स्टोर (Microsoft Store) वर उपलब्ध Windows 2.2250.4.0 अपडेटसाठी WhatsApp बीटा इन्स्टॉल केल्यानंतर WhatsApp कॉलसाठी नोटीफीकेशन्स डिसेबल करण्याची नवीन सूवीधा बीटा परीक्षकांसाठी आणली गेली आहे, असे WABetaInfo अहवालात म्हटले आहे.

WhatsApp फिचर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी वापरकर्त्यांनी खालील स्टेप्सचा वापर करावा. (हे ही वाचा:- WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून नवा फिचर लॉंच, आता कुठलाही व्हॉट्सअॅप ग्रुप शोधा फक्त एका क्लीकवर)

  • WhatsApp सेटिंग्ज उघडा
  • आता हे वैशिष्ट्य शोधण्यासाठी नेटीफिकेशन्सवर जा
  • आता ते तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध आहे की नाही ते तपासा

    नोटीफिकेशन्स अंतर्गत तुम्हाला सूचना अंतर्गत, जर तुम्हाला या वैशिष्ट्यासाठी पर्याय दिसत असेल, तर तुम्ही तो वापरु शकता. जेणेकरुन येणार्‍या WhatsApp कॉलसाठी नोटीफीकेशन्स ऑफ करता येतील.

ट्विट

डू नॉट डिस्टर्ब मोड सुरु असताना देखील कॉलसाठी नोटीफिकेशन्स दिसू शकतात, त्यामुळे आता वापरकर्ते ती नोटीफिकेशन्स अकार्यक्षम करुन स्वयंचलितपणे बगचे निराकरण करु शकतात. त्यामउळे वैशिष्ट्य युजर्सना उपयुक्त ठरु शकते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2022 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).