Pune Fire News: पुण्यातील पिंपरी - चिंचवड शहरातील दोन गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेत दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. २२ जानेवारीच्या मध्यरात्री ही आग लागली. आगीची माहिती मिळताच, स्थानिकांनी आरडाओरड सुरु केला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच गाड्या दाखल झाले.( हेही वाचा- मुंबई मध्ये अविघ्न पार्क इमारतीमध्ये पुन्हा आग;
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेरकरवाडी येथील जय मल्हार कॉलनीत दोन गोदामाला आग लागली. पहाटे २.२४च्या दरम्यान आग लागली. मेमर्स गणेश पेकेजिंग कंपनी आणि विनायक अॅल्यूमिनियम डोअर मेकिंग कंपनीला आग लागली. या भीषण आगीत दोन्ही कंपनी जळून खाक झाल्या आहेत. गोदामात झोपलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ललित अर्जून चौधरी (२१) आणि कमलेश अर्जून चौधरी (वय २३ ) असं या आगीत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. या आगीच काही वाहनांचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच, बचावकार्य सुरु केले. पाणीचा फव्वारा देत आग विझवण्याचे काम केले. २० मिनीटांच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात आली. त्यानंतर कुलींगचे काम सुरु करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने शेजारील इमारतीच्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पुण्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आग लागल्याचे माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.