Teacher Student Sex | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Sex Crime News: पुणे येथे उघडकीस आलेल्या एका घटनेमुळे अवघे शहर अवाक झाले आहे. शहरातील पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. शहरातील एका महिला शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध (Teacher Student Sex) प्रस्तापीत केल्याचे वृत्त आहे. इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत एका 27 वर्षीय शिक्षिकेने त्यास लैंगिक संबंध (Sexual Relationship With Student) ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिक्षिकेला अटक केली आहे. सदर प्रकार गंजपेठ येथील एका नामांकित शाळेत घडला असून, पोलिसांनी आरोपी महिला शिक्षकाविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) कायद्यानुसार गुन्‍हा दाखल केला आहे.

शिक्षिका आणि विद्यार्थीनी दोघेही पुणे येथे वास्तव्यास

अवघ्या पुणे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, सदर प्रकार शालेय आवारात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित मुलगा हा शहरातीलच भवानी पेठ परिसरात राहतो. तर विद्यार्थ्यासोबत सेक्स करणारी कथीत आरोपी शिक्षिका ही पुणे शहरातील धानोरी परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगा हा शुक्रवारी दहावीच्‍या प्रिलियम परीक्षेसाठी आला होता. त्या वेळी त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. (हेही वाचा, Female Teacher Sex with Student: मास्तरीनबाई बिघडल्या; शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध; सेक्स प्रकरणाने खळबळ)

शालेय आवारात लैंगिक संबंध?

शालेय आवरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन सुरक्षेची जबाबदारी शिक्षकांची असते. ही जबाबदारी शिक्षकांनी पर पाडणे अपेक्षीत असते. ज्यामुळे पालक निश्चित असतात. आपली मुले सुरक्षीत ठिकाणी असल्याचा त्यांना विश्वास असतो. हे माहित असतानाही सदर शिक्षिकेने विद्यार्थ्यास आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. इतकेच नव्हे तर त्याला शालेय आवारातच लैंगिक संबंध ठेवसण्यासही भाग पाडले असा आरोप आहे. दरम्यान, सदर प्रकार उघडकीस आल्यांनतर शालेय प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी महिला आरोपीस अटक केली असून, तपास सुरु केला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शालेय आवारास भेट दिली आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच आहे. (हेही वाचा, Female Teacher's Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी)

दरम्यान, पुरुषांकडून महिला मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याबाबतच्या अनेक घटना समाजात घडत असतात. त्याबाबत आवाज उठवला जातो, कायद्याने शिक्षाही होतात. मात्र, महिलांकडून मुले आणि पुरुषांचे शोषण झाल्याच्या फारशा घटना आपल्याकडे उघडकीस येत नाहीत. मात्र, त्या जेव्हा केव्हा उघडकीस येतात तेव्हा मोठी खळबळ माजते. पुणे शहरातही अशाच प्रकारची खळबळ उडाली असून, पालकांध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजवर महिला शिक्षकांप्रती पालकांच्या मनात मोठा विश्वास आणि आदर होता. मात्र, या प्रकरणामुळे या विश्वासास मोठा धक्का बसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.