Pune Doctor Wraps His Mahindra xuv500 With Cow Dung (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तिचं ट्रेंड मध्ये रूपांतर व्हायला अवघ्या काही क्षणांचा अवधी देखील पुरेसा ठरतो. अशाच प्रकारे काही आठवड्यांपूर्वी गुजरात (Gujrat) मधील सेजल शाह (Sejal Shah) या महिलेने उन्हापासून वाचण्यासाठी आपल्या लाखो रुपयांच्या कार ला शेण फासलं होत. या शेण फसलेल्या कारचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काहींनी हा उपाय मूर्खपणाचा ठरवला होता तर काहींनी स्वतःच हा प्रकार तपासून घ्यायचं ठरवलं. त्यापैकी एक म्हणजे पुण्याचे रहिवाशी नवनाथ दुधाळ (Navnath Dudhal) . मुंबईतील टाटा कॅन्सर (Tata Cancer) हॉस्पिटल मध्ये डॉक्टर असणाऱ्या नवनाथ यांनी आपल्या Mahindra XUV500 गाडीला शेणाने सारवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे गाडीचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा 5 ते 7 डिग्री कमी राहायला मदत झाली आहे.

नवनाथ यांनी सकाळ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, गाडीला शेण सारावण्याची कल्पना एक पर्यावरणाला पूरक आहे, यामुळे गाडीचे तापमान इतके थंड होते की मला गाडीत एसी वापरायची देखील गरज भासत नाही. पुण्यात उन्हामुळे अंगाची अक्षरशः ल्हाई ल्हाई होत असताना देखील , पण शेणाने सारवल्याने इतक्या उन्हाचा गाडीवर काहीच परिणाम पडत नाहीये. सोबतच ही कल्पना अगदी सहज शक्य आहे. एकदा गाडीला शेण सरवल्यास ते आवरण साधारण पाने एक महिन्याच्या काळासाठी पुरते शिवाय राहिला प्रश्न गाडी स्वच्छ करण्याचा तर एका महिन्याने फक्त सुती कपड्याने आणि पाण्याने गाडी धुवून काढल्यास सर्व आवरण निघून जाईल. यामुळे गाडीवर कोणताही डाग पडत नाही व वास देखील काही वेळाने निघून जात असल्याचे नवनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

नवनाथ दुधाळ यांनी या कल्पनेला संपूर्ण पाठिंबा दर्शवत आपण स्वतः डॉक्टर असल्याने याआधीही गायीचे शेण व गोमूत्राचे अनेक फायद्यांबद्दल वाचले होते त्यामुळे आता त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचा विचार आला असे देखील सांगितले आहे. मात्र अद्याप वैज्ञानिक दृष्टीने या हटके कल्पनेची पुष्टी करण्यात आलेली नाही.