कोरोना व्हायरस संकट काळात महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावणारे पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune District Collector) नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांची पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister's Office) नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयात ते उपसचिव (Deputy Secretary) पदावर कार्यरत असतील. या पदावर रुजू झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत नवल किशोर राम हे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असणार आहेत.
नवल किरोर राम हे सन 2008 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. पुणे जिल्ह्यात सेवा बजावलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुढे पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. अगदी अलिकडील उदाहरणे द्यायची तर श्रीकर परदेशी आणि आयुक्त कुणाल कुमार हे अधिकारीही पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर कारयरत आहेत. श्रीकर परदेशी आणि कुणाल कुमार यांनी अनुक्रमे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. (हेही वाचा, Mission Begin Again: पुणेकरांना दिलासा! 23 जुलै पासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नाही, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची सूचक माहिती)
पंतप्रधान कार्यालयातून नवल किशोर राम यांच्या नियुक्तीबाबत पत्र देण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबात एक पत्रक काढून माहिती दिली आहे. त्यामुळे नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे.