Pune: पुणे येथे भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणींचा बुडून मृत्यू, चौघींचे मृतदेह सापडले
Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुणे जिल्ह्यातील (Pune Distric) भोर (Bhor) तालुक्यातील भाटघर धरणात (Bhatghar Dam) पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. पाचपैकी चौघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाचव्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच धरणात चार शालेय मुली बुडाल्या होत्या. या चारही मुली खेड (khed) तालुक्यात सह्याद्री स्कुलमधील होत्या. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच घटना पुढे आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुरक्षेबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे. आज घडलेल्या घटनेतील सर्वच तरुणी पुण्यीतल असल्याचे समजते.

घटनेबाबत माहिती अशी की, पुण्यात राहणाऱ्या रहिवाशांचा एक समूह भाटघर धरणावर पर्यटणासाठी आला होता. या समूहातील पाच तरुणी पोहण्याच्या निमित्ताने धरणात उतरल्या. त्यांना पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी पाचही जणींचा बुडून मृत्यू झाला. तरुणी पाण्यात बुडताना आजूबाजूच्या पर्यटकांनी आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून परिसरातील नागरिक धावत आले. नागरिकांकडून या तरुणांना वाचविण्याचे प्रयत्न झाले मात्र त्याला यश आले नाही. (हेही वाचा, रायगड: मुरुड येथील फणसाड धरणात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू)

ट्विट

धरणात बुडालेल्या पाचपैकी चार जणींचे मृतदेह सापडले आहेत. पाचव्या तरुणीचा शोध सुरु आहे. खुशबू लंकेश राजपूत(वय. 19, रा बावधन), चांदणी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप राजपूत (वय 22, दोघीही रा. संतोषनगर हडपसर पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय23 रा नऱ्हे, ता.भोर) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेली मनीषा लखन राजपूत (वय २०, रा संतोषनगर हडपसर पुणे) हिसुद्धा पाण्यात बुडाली आहे. मात्र,तिचा मृतदेह अद्यापही सापडला नाही. रात्री उशीरपर्यंत मृतदेह शोदण्याचे काम सुरु होते.