Pune Crime News: पुणे शहर पुन्हा एका घटनेने हादरलं आहे. अवघ्या काही क्षुल्लक घटनेमुळे तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या समोर सुरक्षेताचा प्रश्न उभा राहिला आहे. पोलिस प्रशासनांवर प्रश्न उढवला जात आहे. रात्रीच्या वेळीस एका टोळक्यांनी येऊन तरुणाला तु इथे का थांबलास ? असा प्रश्ना विचारत, तरुणाला बेदम मारहाण केली आहे. एवढं नाही तर तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई जुन्या महामार्गालगत तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शेळके असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारच्या रात्री आठच्या सुमारास झाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कृष्णासोबत आणखी दोन मित्र घटनास्थळी उपस्थित होते. रस्त्यावर तिघे जण थांबले होते. यावेळी अचानक चार आरोपीचा टोळी आला. त्यांच्यात एकमेंकांमध्ये वाद देखील झाला. यातून कृष्णाची निर्घृण हत्या करण्यात आली.
रस्त्यावर या घटनेमुळे फार गोंधळ झाला. या घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली. आरोपी फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.