दहावीचा पेपर देऊन घरी परतत असणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक घटना गोदिंया येथून समोर येत आहे. अतुल तरोणे (17) असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (3 मार्च) रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास पेपर देऊन घरी परतत असताना हा प्रकार घडला. गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेला अतूल घरी परतत असताना त्याच्या घरापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर अनेक ठिकाणी चाकुने वार करण्यात आले. इतंकच नाही तर त्याची जीभही कापण्यात आली. हल्ल्यानंतर त्याला गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. सायंकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची तपासणी करण्यासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात मृतदेह ठेवण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप हत्येचे खरे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.

पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. निवांत दोन गप्पा मारत असलेल्या मित्रांवर आत्मघाती हल्ला झाला असुन त्यातील एक तरुणावर कोयता-तलवारीने सपासप वार करण्यात आले. तरी जुन्या वादातून ही निघृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तरी हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुरज शिंदे असुन त्याचं वय २२ वर्ष होतं. तरी सुरज आणि त्याचा मित्र पिंपरी चिंचवड भागातील चिखली येथील बैलगाडा शर्यत घाटातील महादेवाच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. तर अचानक तेथे आदित्य पाटोळे आपल्या काही मित्रांसोबत दाखल झाला. पूर्वी आदित्य आणि सुरजमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली पण आदित्य आणि त्याच्या मित्रांनी सोबत शस्त्र बाळगली होती. बघता बघता आदित्या आणि सुरजचा वाद शिगेला पेटला आणि आदित्य सह त्याच्या मित्राने सुरजला कोयता भोकसला.

 

संबंधित घटनेबाबत सुरज सोबत असलेल्या मित्राने पिंपरी चिंचवड पोलिसात या हत्येसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. तरी घडलेल्या प्रकरणाचा पिंपरी चिंचवड पोलिस सखोल तपास करत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण वाढलं असुन आता गुन्हेगारांना काही कायद्याची भितीचं उरली नाही असचं चित्र भासू लागलं आहे.   याप्रकरणी पोलिसांनी आदित्य पाटोळे आणि त्याचे मित्र विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव या चार आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (हे ही वाचा:- Bhosari Suicide Case: भोसरीत 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल)

 

पुण्यातील गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. हडपसर भागात देखील कोयता गॅंगने उच्छाद मांडला असुन पुणे, पिंपरी चिंचवड पोलिस अशा विविध घटनांची चौकशी करत असुन नागरिकांनी सहयोग द्यावा तसेच घाबरुन जावू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.