पुण्यातून (Pune) एक Chit Fund Fraud ची घटना समोर आली आहे. तब्बल 13 महिलांना एकूण 60 लाख रुपयांचा दंड लावल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) एका महिलेला अटक केली असून तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हे दाम्पत्य 2018 पासून Chit Fund चालवत आहेत. या दोघांनी केलेल्या घोटाळ्याची रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे. (Thane: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 8 कोटींची फसवणूक; Jewellery Firm च्या मालकाला अटक)
या दाम्पत्याने 2018 मध्ये फक्त महिलांसाठी Chit Fund योजना सुरु केली होती आणि या योजनेतून अधिक रक्कम परत मिळण्याचे आमिष दाखवले होते. रत्ना अप्पाणे नामक गृहिणीने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी आणि पैसे गुंतवणाऱ्या महिला या आंध्र प्रदेशच्या असून सध्या पुण्यातील घोरपडी येथे स्थायिक आहेत.
हे दाम्पत्य नवीन गुंतवणूकदारांसोबत सातत्याने मिटिंग घेतात आणि 12 ते 15 महिन्यांसाठी पैसे गुंतवण्यास त्यांना भरीस पाडतात. माझ्या पत्नीने वर्षभरात सुमारे 7 लाख रुपये गुंतवले. मार्च 2020 पर्यंत आम्हाला पैसे डबल करुन मिळणार होते. परंतु, तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचे कारण देऊन आरोपी पैसे देणे टाळत होते, अशी रत्नाचे पती वंकटेश्वरराव यांनी टाईम्सशी बोलताना दिली.
लॉकडाऊन संपल्यानंतर पैशाची मागणी केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अशा प्रकराच्या कोणत्याही स्किमचा लेखी व्यवहार आपल्यामध्ये झाला नव्हता, असे आरोपी सांगू लागले. त्यानंतर आरोपींनी मुंढवा पोलिस स्टेशनात आमच्या विरुद्ध धमकीची आणि सोनेचोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात प्राथमिक चौकशी केली असता त्यांना काही सापडले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांकडून तक्रार आल्यानंतर आम्ही यासंदर्भात सखोल चौकशी सुरु केली. पीडितांकडून घेतलेले पैसे आरोपींनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवले असल्याचे पोलिसांनी कळले. दरम्यान, 13 विविध महिलांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी दाम्पत्याची सखोल चौकशी केली जाणार असून गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी नेमके कुठे वापरले, याचा शोध घेतला जाईल.