Love | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

अभ्यास करण्याच्या वयात निर्माण झालेल्या आकर्षणातून (One Sided Love) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका मुलाने चक्क आपल्या वर्गातील मुलीलाच प्रपोज केले. या मुलात निर्माण झालेल्या रोमिओने पीडित मुलीचे फोटो चोरुन काढले आणि त्याचा एक कोलाज बनवून तिला व्हॉट्सअॅप (Whatsapp) केले. त्या फोटोसोबत त्याने तिला प्रपोजही केले. घाबरलेल्या मुलीने ही घटना आपल्या आईला सांगितली आणि आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) परिसरात ही घटना घडली. हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station ) पीडितेच्या आईने तक्रार दिली आहे.

मुलीला प्रपोज करणारा कथीत मुलगा आणि मुलगी दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात सिकतात. पीडिता 13 तर तो मुलगा 14 वर्षांचा आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर मुलगा पाठिमागील काही काळापासून पीडित मुलीचा पाटलाग करत होता. तो तिचे चोरुन फोटो काढण्याचा आणि प्रेमासाठी होकार देण्यासाठी दबावही टाकत असल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Husband Wife Quarrel: बायकोच्या भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याचा ताडाच्या झाडावर मुक्काम; उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्यातील घटना)

आठवीत शिकणाऱ्या या मुलाने पीडितेला अनेक वेळा प्रपोज केले. परंतू, तीने त्याला नकारच दिला. शेवटी त्याने पीडितेचे चोरुन फोटो काढले. त्याचा एक कोलाज बनवला आणि ते व्हॉट्सअॅपवर पाठवून दिले. त्यासोबत त्याने तिला प्रपोज केले. त्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकारआपल्या आईला सांगितला. आईने या प्रकाराची पोलिसात जाऊन तक्रार दिली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी तक्रारीची नोंद करुन घेतली आहे. सध्या परीक्षांचा काळ आहे. परीक्षा संपल्या की या मुलाची चौकशी केली जाईल. तसेच, या मुलाला ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोरही हजर केले जाण्याची शक्यता आहे. मुलाच्या कुटुंबीयांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती असून, लवकरच त्याच्या पालकांनाही मुलाच्या कृत्याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.