महात्मा गांधी यांच्या 72 व्या पुण्यतिथी निमित्त पुणे (Pune) येथे आज संध्याकाळी 6 वाजता नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), NCR याच्या विरोधात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सभेला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या उपस्थिती लावणार होत्या. परंतु आयोजित केलेल्या या सभेला पोलिसांकडून नोटिस धाडण्यात आली आहे. एनआरसी विरोधात कुमार सप्तर्षी यांनी व्याख्यात्यांना सभेसाठी बोलावले होते.
गांधीभवन येथे कुमार सप्तर्षी यांनी एका सभेचे आयोजन केले होते. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यासह उर्मिला मातोंडकर उपस्थिती लावण्यात होत्या. तर या सभेपूर्वी सप्तर्षी यांनी एक पत्रक जाहीर केले होते. त्यामध्ये असे लिहिण्यात आले होते की, आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सध्याच्या स्थितीत त्यांच्या विचाराचे आचरण करणे हाच सभेचा मुख्य हेतू आहे. पण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर वरुन संपाताची लाट उसळली असून त्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलन केली जात असली तरीही त्यांना हिंसक वळण लागल्याचे दिसून आले आहे. मात्र देशातील ही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आपण अमंलात आणले पाहिजेत. त्यामुळेच या सभेला महात्मा गांधी यांच्या विचार प्रेमींना आमंत्रित करण्यात आले.(Martyrs’ Day 2020 Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या राष्ट्रपितांना आदरांजली)
आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची 72 वी पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. तर भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे ज्यांनी नेतृत्व केले त्या महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली. तोच दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो.