Martyrs’ Day 2020 Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या राष्ट्रपितांना आदरांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधी (फोटो सौजन्य- File Photo)

आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची 72 वी पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. तर भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे ज्यांनी नेतृत्व केले त्या महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली. तोच दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. राज्य सरकारकडून या दिवशी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदराजंली वाहण्याचे परिपत्रक काढले आहे.

30 जानेवारीला महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या अंतयात्रेला तब्बल 10 दशलक्ष लोक सहभागी झाल्याचे सांगितले जाते. तसेच ही अंतयात्रा 8 किमी एवढी लांब होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजी आयुष्यभर लढले. ब्रिटिशांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट लॉन्च करण्यात आले. तसेच गांधीजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पत्रे लिहीली आहेत. यात हिटलर, टॉल्सटॉय आणि आइन्स्टाइन यांचा समावेश आहे. तर Martyrs’ Day 2020 Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या राष्ट्रपितांना आदरांजली!(Martyrs’ Day Significance: 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचे कारण)

>>'राष्ट्रपिता' महात्मा गांधी

 यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

>शहीद दिवस

Martyr's Day

30 January

'राष्ट्रपिता' महात्मा गांधी

यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

>>30th January

Martyr's Day

>>शहीद दिवस

30 जानेवारी

क्रांतिकारी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली होती. त्यानंतर हा दिवस महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महात्मा गांधींना विशेष श्रद्धांजली वाहिली जाते.