पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीला चाकूने भोकसल, प्रियकराने काढला पळ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Flickr,Maarten Van Damme)

पुणे (Pune) येथे एका प्रियकराने प्रेयसीवर चारित्र्याच्या संशयाने चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीचा मृत्यू झाला असून प्रियकराने घटनास्थळाच्या येथून पळ काढला आहे.

मीना पटेल असे तरुणीचे नाव असून ती एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. मात्र एक महिन्यापासून ती घरीच होती. तर प्रियकर हा सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. या दोघांचे प्रेमसंबंध असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वाद सुरु होते. या दरम्यान मीना हिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यामुळे वाद अजूनच चिघळला.

(नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी बायकोने लढवली शक्कल, चक्क वेश्या व्यवस्याय करणाऱ्या महिलेला पेटवले)

काल मीना आणि तिचा प्रियकर एकमेकांना भेटले. त्यावेळीसुद्धा त्यांचे एकमेकांसोबत भांडण झाले. त्यावेळी प्रियकराने मीना हिच्या पोटात चाकू भोकसून तेथून पळ काढला. या प्रकरणी प्रियकराचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.