पुणे (Pune) येथे आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अमनोरा शाळेने (Amanora school) विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी प्रवेश नाकारला असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही पालकांनी वाढीव फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले घरपोच देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
अमनोरा शाळेच्या प्रशासनाने बेकायदेशीर फी वाढवल्यामुळे पालकांनी यासाठी विरोध केला. तर वाढीव फी न भरल्याने आज विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवर अडवण्यात आले असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे शिक्षण हा आमचा मूलभूत हक्क असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-मुंबई: गुणवत्तेर आरक्षणासाठी हायकोर्टाचा सुनावणीस नकार)
We are students of #Amanora school pune. School has issued TC to us . Even we paid legitimate fees. Education is our fundamental right. Please help us to restore in school.@PMOIndia @PrakashJavdekar @TawdeVinod
— jay kumar (@jayinspire) April 11, 2019
We are students of #Amanora school pune, School has issued Transfer Certificate for us. Education is my fundamental write.
Today school reopened for new academic year and school did not allowed us to enter the school. Please join us .Thank you.@TawdeVinod @PrakashJavdekar pic.twitter.com/5RcUMzLlZi
— सुजित जाधव (@sujitgr8) April 10, 2019
@AmanoraSchool शाळेची मान्यताच रद्द केली पाहिजे जर ते शैक्षणिक शुल्कावरून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असतील.. @NCPspeaks @Dev_Fadnavis @RajThackeray @AUThackeray @supriya_sule #सर्वशिक्षाअभियान अंतर्गत शिक्षण भेटायचा हक्क नाकारणे हा अक्षम्य गुन्हा आहे.
— Devendra (@DevTheD) April 11, 2019
तर पालकांकडून अवाजवी फी वाढीची शिक्षा मुलांना का दिली जात आहे असा सवाल शाळेला केला आहे. पुणे शिक्षण उपसंचालक यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे शाळेतून काढल्याचे दाखले परत घ्यावे असे शाळेला पत्र लिहिले होते. परंतु शाळेने पत्राकडे दुर्लक्ष करत त्यांचा मनमानी कारभार सुरु ठेवल्याचे सुद्धा काही पालकांनी सांगितले आहे. त्यामुळे फी वाढीमुळे शाळेवर आरोप करत पालकांनी आता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शाळेकडून जो पर्यंत दाखले परत घेतले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहिल असे पालकांकडून सांगण्यात येत आहे.