पुण्यात (Pune) सहा परदेशी नागरिकांकडे एमडी आणि कोकेन ड्रग्ज आढळल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचा सुद्धा समावेश असून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल 68 लाख रुपये आहे. हसन अली कासीद, बेकाई हामिस, नामहानक्यू डेविड, मंदा दाऊद हे तांझानिया येथील आहेत. तर पेर्सी नाईगा आणि शामिन नांदवाला हे युगांडा येथून असून यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Muslim Personal Law Board: हुंडा घ्याल तर लग्न नाही लावणार,मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय)
पोलिसांना या प्रकरणी टीप मिळाली असता अॅन्टी नार्कोटिक्स सेलकडून आर्थर हिल्स सोसायटी मधून आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी यांच्याकडून 136.8 ग्रॅमचे कोकोन ज्याची किंमत जवळजवळ 9,57,600 रुपये आहे. तर 1.151 ग्रॅम एमडी ची किंमत 57,55,000 रुपये आणि 54 हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याचसोबत आरोपींकडून वजनाची मशीन, सेलफोन्स, बॉटल्स आणि प्लास्टिक बॅग्स ही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.(Mumbai: विमान प्रवासासाठी कोविडचे बनावट रिपोर्ट्स दाखवणाऱ्या परिवाराच्या विरोधात FIR दाखल)
शामिम, डेविड आणि मंदा या महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघी अन्य तीन जणांसोबत एका रो हाऊसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राहत होत्या. मंदा ही बी. फार्माची विद्यार्थिनी असून बेकिया हा टुरिस्ट व्हिजावर भारतात आला होता. तर कसीद हा गार्मेंट्सचा उद्योग करणार असल्याचे सांगत आला होता. या तिघांकडून बंदी असलेले एमडी आणि कोकेनची विक्री पुण्यातील ग्राहकांना केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणी अधिक तपास केला जात असून त्यांना कुठून ड्रग्ज पुरवले जात होते आणि ते विक्री करण्यामागील आरोपी कोण याचा शोध घेतला जात आहे.