The Sky Is Pink चित्रपटातील प्रियंका चोप्रा हिच्या संवादावर महाराष्ट्र पोलीस म्हणतात, '.. तर होईल 7 वर्षांची शिक्षा'
The Sky Is Pink (Photo Credits: Twitter)

गेल्या काही वर्षांपासून प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमुळे बॉलिवूडमधून गायब आहे. पण आता ती 'द स्काय इज पिंक' (The Sky Is Pink) या चित्रपटाद्वारे पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटामध्ये प्रियंकासोबत फरहान अख्तर (Farhan Akhtar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलरला दोघांच्याही चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. प्रियंकाच्या कमबॅक चित्रपटाचा हा ट्रेलर रिलीज होताच ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र ट्रेलरमधील एका व्याक्यामुळे त्या गोष्टीबद्दल महाराष्ट्र पोलिसांना जागरुकता निर्माण करण्याची गरज भासली आहे.

ट्रेलरमध्ये प्रियंका चोप्राच्या तोंडी, 'एक बार आएशा ठीक हो जाए ना, फिर साथ में बैंक लूटेंगे..' असे एक वाक्य आहे. याच वाक्याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करत अशा कृत्याचे परिणाम सांगितले आहेत. बँक लुटली तर आयपीसी सेक्शन 393 (IPC Section 393) अंतर्गत 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो असे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून हे वॉर्निंग मिळाल्यानंतर प्रियंकालासुद्धा तिची चूक लक्षात आली आणि लगेचच 'अरेरे ... मला रंगेहाथ पकडले गेले आता मला प्लान B तयार करावा लागेल’ अशा शब्दांत तिने उत्तर दिले आहे. ट्रेलरमधील एका संवादामुळे समाजामध्ये कोणताही गैरसमज पसरू नये महाराष्ट्र पोलीस काळजी घेत आहेत हे यावरून दिसून येत आहे. (हेही वाचा: हृदयस्पर्शी कथेतून नात्यांमधील भावना व्यक्त करणाऱ्या 'The Sky Is Pink' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Video))

दरम्यान, 'मार्गारीटा विथ ए स्ट्रॉ' फेम चित्रपट निर्माती शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियांकाशिवाय जायरा वसीम, फरहान अख्तर, रोहित सराफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.