Priyanka Chaturvedi Writes to Rajnath Singh: INS Viraat संदर्भात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे राजनाथ सिंह यांना पत्र लिहित केली 'ही' सिफारीश
प्रियंका चतुर्वेदी (फोटो सौजन्य-IANS)

Priyanka Chaturvedi writes to Rajnath Singh:  महाराष्ट्र सरकारकडून सेवेतून निवृत्त झालेली विमानवाहन जहाज आयएनएस विराट च्या दुरुस्तीसह त्याचे जतन करण्यासंदर्भात केंद्राला एक प्रस्ताव पाठवला आहे. शिवसेनेतील राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या बद्दल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच संरक्षणमंत्रालयाकडून यासाठी एक NOC ही त्यांनी मागितली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्राला या ऐतिहासिक अशा युद्ध जहजाचे पुनरोद्धार आणि संरक्षण केल्यास त्याचा आनंद वाटेल. पुढे चतुर्वेदी यांनी असे ही म्हटले की, ही अत्यंत दु:खद आहे की गुजरातच्या अलंग येथे INS Viraat ही भंगारमध्ये देण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे ज्यावेळी आयएनएस विराट ही गुजरात मधील अलंग येथे नेली जात आहे. शिप ब्रेकर कंपनीकडून हे युद्धाचे जहाज भंगार मध्ये देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

Envitech या खासगी कंपनीने या युद्धनौकेची खरेदी करण्यासह त्याचे जतन करुन नौदल स्मारकात ठेवण्यासंदर्भातील याचिकेबद्दल सोमवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र संरक्षण मंत्रालयाकडून ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. युद्धनौका 35.8 कोटी रुपयांना श्री राम शिपब्रेकर्स यांना दिली गेली आहे. समूहाचे प्रमुख मुकेश पटेल यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारच्या एनओसी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही.(INS Viraat: 30 वर्ष सेवेसाठी दिलेल्या आयएनएस विराट जहाजाचा अंतिम प्रवास; मुंबईहून गुजरात च्या दिशेने वाटचाल सुरु)

Tweet:

राजनाथ सिंह यांना पत्रात चतुर्वेदी यांनी असे म्हटले आहे की, देशस्तरावर सेवेतून निवृत्त झालेल्या जहाजाचा वापर नागरिकांना सैन्याच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यास अधिक प्रभावी ठरेल. ही दु:खद गोष्ट आहे की, ही युद्धनौका संग्रहालयाच्या प्रस्तावापूर्वी दिली गेली आहे. मात्र संरक्षणमंत्रालय यासाठी एनओसी देत नाही आहे. आयएनएस विराट संदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांच्या पत्राची एक प्रत एनडी टिव्हीकडे सुद्धा आहे. भारतीय नौसेनेत दाखल होण्यापूर्वी आयएनएस विराट रॉयल नेवी मध्ये एचएमवी हर्मेस केन नावाने सेवा देत होती. ते साउथ अटलांटिक मध्ये 1892 मध्ये फॉकलंड आयलँड युद्धात सहभागी करण्यात आले होते.