Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मधील एका प्रतिष्ठित शाळेचे मुख्याध्यापक सेक्सटॉर्शनचे (Sextortion) शिकार बनल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना एका अश्लील व्हिडिओ वरून धमकी देण्यात आली आहे. हा व्हिडिओ वायरल केला जाईल असे त्यांना सांगण्यात आले आहे यासाठी 1200 डॉलरची बिटकॉईन द्वारा मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सध्या सायबर सेल कडे तक्रार करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापकाची एका महिलेसोबत सोशल मीडीयाद्वारा मैत्री झाली होती. या महिलेने एकदा न्यूड व्हिडिओ कॉल केला. यावेळी मुख्याध्यापकालाही तिने काही अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर इमेल द्वारा मुख्यध्यापकांच्या अश्लील व्हिडिओला प्रसारित केले जाईल अशा आशयाचा मेसेज आला आणि तसे होऊ द्यायचे नसल्यास 1200 डॉलर देण्याची मागणी करण्यात आली.  इमेल उघडल्यापासून यासाठीच काऊंनडाऊन सुरू झाल्याचा धमकी वजा इशारा देखील देण्यात आला होता. हे देखील नक्की वाचा: Sextortion बद्दल महाराष्ट्र सायबर कडून नागरिकांना महत्वाची सुचना जाहीर .

मुख्याध्याकांनी या प्रकारानंतर वांद्रे-कुर्ला संकुल सायबर पोलिस स्थानकामध्ये धाव घेतली. सध्या पोलिसांकडून आयपी अ‍ॅड्रेस द्वारा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.