पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रविवारी पुणे (Pune) शहर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्वे रस्ता आणि पौड रस्त्याचा काही भाग सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या (Metro Project) उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी रविवारी पुण्यात येत आहेत. डीसीपी श्रीरामे यांच्या आदेशानुसार गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो जंक्शन या मुख्य कार्याचा विचार करता खंडोजी बाबा चौक ते शिवतीर्थ नगर दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. हेही वाचा पुण्यात 'तोकडे कपडे' घातल्यावरून भाडेकरू म्हणून राहणार्या 2 मुलींना मारहाण; एकाच कुटुंबातील 6 जण पोलिसांच्या ताब्यात
कर्वे रोडने कोथरूडकडे जाणारी वाहने टिळक चौकात आणि तेथून दांडेकर पूल किंवा म्हात्रे पूल डीपी रोडने करिश्मा सोसायटीकडे वळवण्यात येतील. शिवतीर्थ नगर येथून डेक्कन परिसरात येणारी वाहने मयूर कॉलनी येथे वळविण्यात येणार आहेत.