PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर, येत्या 10 फेब्रुवारीचा मुहूर्त
PM Narendra Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi Mumbai Visit) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहे. येत्या 10 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी ते बोहरा समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे मुंबई दौरे वाढले असल्याची चर्चा आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मुंबईवर सत्ता मिळविण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेनेची ताकद (ठाकरे गट) काहीशी कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजप शिवसेनेतील दुफळीचा फायदा घेण्याच्या विचारात आहे.

नरेंद्र मोदींचा दौर का?

मुंबईत बोहरा समाजाने बांधलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती आहे. मध्यंतरी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली होती.

सांगितले जात आहे की, मुंबई महापालिका निवडणुका अत्यंत तोंडावर आहेत. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिमागच्याच आठवड्यात मुंबईला येऊन गेले. मुंबईत त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि काही विकासकामांची पायाभरणी केली. या दौऱ्यात मुंबई महापालिकेतील सत्तेकडे अप्रत्यक्षरित्या बोट दाखवत मोदी यांनी नामोल्लेख टाळून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर भाष्य केले होते. (हेही वाचा, PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे अनेकांना मनस्ताप, मेट्रो 1 बंद राहिल्याने सुमारे 55 हजार प्रवाशांना फटका)

दरम्यान, मुंबईत असलेल्या बोहरा समाजाला आपलेसे करणयासाठीच भाजपचा आटापीटा सुरु असलयाचे सांगितले जात आहे. एनकेन प्रकारेन भाजपला मुंबईत सत्ता हवी आहे. त्यामुळेच भाजप इतकी ताकद पनाला लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुआहे.