Maharashtra Wardha Car Accident: वर्धा कार अपघातातील  मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहीर
Maharashtra Wardha Car Accident (Photo Credit - Twitter)

Maharashtra Wardha Car Accident: वर्धा-देवळी मार्गावर झालेल्या अपघातात (Wardha Accident) सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे सांगवी येथील वैद्यकीय महाविद्यालात शिक्षण घेत होते. प्रवास करताना झायलो कार (Zaylo Car) पूलावरुन कोसळल्याने हा अपघात झाला. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून माहिती देत म्हटले आहे की, सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या माध्यमातून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

सांगवी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात हे सर्वांचा मृत्यू झाला. यात आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. वर्धा-देवळी (Wardha-Deoli Road) मार्गावर रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, सर्वजण जागीच मृत ठार झाले. प्राप्त माहितीनुसार, सेलसुरा येथील रस्ता दुभाजकाला गाडीची धडक बसली आणि गाडी पुलावरुन खाली कोसळली. ही घटना कळल्यावर नागरिक जेव्हा मदत आणि बचाव कार्यासाठी धावले तेव्हा गाडीचा चेंदामेंदा झाला होता आणि सर्वजण गतप्राण होते. (हेही वाचा, Wardha Accident: झायलो गाडी पूलावरुन कोसळली, वर्धा-देवळी मार्गावर अपघातात सात जण जागीच ठार; मृतांमध्ये आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश)

ट्विट

सावंगी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील सर्वजण मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा असल्याची चर्चा आहे.