Vegetable Prices Rise In Mumbai (PC - ANI)

Vegetable Prices Rise In Mumbai: मुंबईत बाजारपेठेत (Mumbai Market) सर्वच भाजीपाल्याचे दर (Vegetable Prices) प्रचंड वाढले आहेत. परिणामी गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याच्या किंमती वाढल्यामुळे ग्राहकांच्या खीशाला कात्री लागली आहे. सर्वंच भाजीपाल्याचे दर वाढल्याने आम्हाला भाजीपाला घेणं कठीण होत आहे, अशी प्रतिक्रिया विशाल नावाच्या ग्राहकाने दिली आहे. सध्या कोथींबीरची एक जूडी 30-40 रुपयांना विकली जात आहे. तसेच कांदा 100 रुपये प्रतिकिलोवर झाला आहे. कांद्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचे बजेट, आमचा खर्च सांभाळणे अवघड झालं असल्याचं कादंबरी शिंदे या महिला ग्राहकाने म्हटलं आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सर्वचं भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली. राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस पडल्याने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता सर्व भाजीपाल्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. (हेही वाचा - Mumbai Local Updated: मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती)

राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाने भाजीपाला पिकाचे नासधूस झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हिरवी मिरची, बटाटा, वांगी, कारली, दोडका, बिन्स, कोबी, फ्लॉवर, गवार, आदी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपली भूक भागवण्यासाठी नेमक्या कोणत्या भाज्या खरेदी कराव्यात? असा प्रश्न पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीतदेखील मोठी वाढ होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनांवरून 1500 मेट्रिक टन करावी, अशी मागणी केली आहे.