President's Police Medal: देशातील 901 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर, देवेन भारती यांच्यासह महाराष्ट्रातील 74 जणांचा समावेश
(Photo Credits: ANI)

महाराष्ट्र पोलीस दलावर राष्ट्रपती पदकांची मोहोर उमटली आहे. राज्यातील एकूण 74 पोलिसांची राष्ट्रपती पोलीस (President's Police Medal) पदकांसाठी निवड झाली आहे. प्रजासत्ताक (Republic Day 2023) दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (25 जानेवारी) या संदर्भात घोषणा झाली. यात मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांचाही समावेश आहे. देवेन भारती यांच्याशिवाय आणखी चार पोलिसांचा यात समावेश आहे. या सन्मानासोबतच आणखी 31 जणांना 'पोलीस शौर्यपदक' तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.

राष्ट्रपती पोलीस पदक घोषीत झालेले पोलीस अधिकारी

देशभरात 901 पोलीस पदकं जाहीर

देशभरातून एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. त्यापैकी पदक आणि संख्या खालीलप्रमाणे

  • शौर्य पोलीस पदक- 140 (Police Medal for Gallantry)
  • राष्ट्रपती पोलीस पदक- 93 (President’s Police Medal for Distinguished Service)
  • गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक- 668 (Police Medal for Meritorious Service)

दरम्यान, दहशतवाद प्रभावीत प्रदेशामध्ये कार्यरत असलेल्या 80 कर्मचाऱ्यांना 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात जम्मु आणि कश्मीर येथे कार्यत असलेल्या 45 जवानांचा समावेश आहे.

शौर्यसाठी पोलीस पदक (PMG) जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केले जाते. पोलीस सेवेतील विशेष प्रतिष्ठित विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) प्रदान केले जाते आणि गुणवत्तेसाठी पोलीस पदक (PM) संसाधन आणि कर्तव्याच्या निष्ठेने वैशिष्ट्यीकृत केलेल्या मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते.