उद्धव ठाकरे, संजय राऊत । File Photo

शिवसेनेने महाविकास आघाडी मोडून पारंपारिक मित्र भाजपा सोबत राहण्याची सेनेतील एका गटाचं मत आहे. याच इच्छेमधून विधिमंडळात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खासदारांसोबत याबाबत निर्णय घेण्यासाठी एक बैठक घेतली. त्या बैठकीत खासदारांचा सूर देखील भाजपा पुरस्कृत Draupadi Murmu यांना पाठिंबा देण्याचा खासदारांचा कल दिसून आला आहे.  दरम्यान संजय राऊत यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत. Who Is Draupadi Murmu? जाणून घ्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मुर्मू नक्की कोण आहेत

संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिकप्रतिक्रियेमध्ये आपण एक आदिवासी महिला उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतो. तसा विचार केला जाऊ शकतो पण याचा अर्थ हा पाठिंबा भाजपाला आहे असा होत नाही. यापूर्वी देखील शिवसेनेने पक्ष बाजूला ठेवत राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे हे एनडीए चे उमेदवार नव्हते. पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक-दोन दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत. पण यावेळी त्यांनी सेना कोणत्याही दबावाखाली हा निर्णय घेत नसल्याचंही ठणकावून सांगितले आहे.

लोकशाही मध्ये विरोधकही जिवंत असणं आवश्यक आहे. आमच्या शुभेच्छा यशवंत सिन्हा यांच्यासोबतही असतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान शिवसेना आमदारांमध्ये बंडाळी झाल्यानंतर खासदारही फूटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. पण सेनेचं नुकसान टाळण्यासाठी आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरून प्रयत्न करताना दिसत आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीत देखील खासदारांचा सूर हा आगामी काळात भाजपा सोबत जुळवून घेण्याचा असावा असाच दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल शेवाळे यांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करावा अशा आशयाचं पत्र उद्धव ठाकरेंना दिले आहे.