राज्यात मध्यावधी निवडणुकांचं लवकरचं बिगुल वाजणार, शिंदे फडणवीस सरकार लवकरचं पडणार असा दावा रोज विरोधी पक्षातील कुठल्यातरी एखाद्या नेत्याकडून केल्या जातो. पण आता तर राजकारणातील चाणक्य यांनीचं आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीत आतील कलह बाहेर आल्याची सध्या चर्चा रंगली आहे. दादा विरुध्द ताई असे दोन गट सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडताना दिसत आहेत. तरी राष्ट्रावादील परिस्थिती काही आलबेल नाही. जे शिवसेनेत सहा महिन्यांपूर्वी झालं तेचं राष्ट्रवादीतही होवू शकत अशा चर्चांणा उधाण आलं असताना मात्र राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तरी शरद पवारांनी दिलेल्या या सुचना विधानसभा निवडणुकीसाठी नसुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंबंधी सुचना दिल्या आहेत.

 

मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असा भाकीत थेट राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला आहे. पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना या संबंधीत माहिती दिली आहे. मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे आदेश शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार यांनी काल पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी दरम्यान या सुचना दिल्या आहेत. (हे ही वाचा:- Sanjay Raut Statement: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची जोरदार टीका, म्हणाले - हे राजकारणाशिवाय दुसरे काही नाही)

 

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली असुन पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरुरचे आमदार अशोक पवार, इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. तसेच बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांनी हजेरी लावली होती.