धक्कादायक! हिंगोलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचाराला कंटाळून घेतला गळफास
Gang rape (Image used for representational purpose)

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात गर्भवती महिलेवर (Pregnant Women) सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गर्भवती महिलेवर अत्याचार करणाऱ्या 3 आरोपींवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यास मदत झाली आहे. पीडित महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांत नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - अहमदनगर: प्रेयसीसोबतचे Sex Videos मोबाईलमधले पाहिले म्हणून नवऱ्याने बाकोला जिवंत जाळले)

पीडित महिला 2 महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे पीडितेसोबत आणखी एक जीव गेला आहे. या घटनेमुळे पीडित महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सेनगाव पोलिसांनी पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यात महिलांवरील बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. मात्र, आता अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.