अहमदनगर: प्रेयसीसोबतचे Sex Videos मोबाईलमधले पाहिले म्हणून नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले
Husband Wife Relationship | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य शरीरसंबंधांचे व्हिडिओ (Sex Vide) पाहिले म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या बायकोला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात घडली आहे. पीडित पत्नीवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी फरार आहे. शंकर दुर्गे असे आरोपीचे नाव आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे घडली. हिंगणघाट येथे घडलेली जळीतकांटाची घटना तजी असतानाच हा आणखी एक तसाच प्रकार पुढे आल्याने महिलांवरील सामाजिक आणि कौटुंबीक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. केवळ मोबाईलमध्ये असलेले दुसऱ्या महिलेसोबत असलेले सेक्स व्हिडिओ (Husband Sex Video) पाहीले म्हणून नवऱ्याने इतके टोकाचे पाऊल उचलावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

नेवासे तालुक्यात असलेल्या मोरेचिंचोरा गावचा रहिवासी असणारा शंकर दुर्गे या महिलेचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधाची त्याच्या पत्नीला काहीही माहिती नव्हती. दरम्यान, शंकर दुर्गे हा बाथरुममध्ये गेला असता त्याच्या पत्नीने त्याचा मोबाईल पाहिला. या मोबाईलमध्ये तिला पती शंकर दुर्गे आणि दुसरी महिला यांच्यातील शरीरसंबंधाचे व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळाले. शंकर बाथरुममधून बाहेर आल्यावर तिने या संबंधाबाबत त्याला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

पत्नीने आपले व्हिडिओ पाहिले असून नातेवाईक आणि कुटुंबामध्ये आता आपले बिंग फुटणार अशी त्याला भीती वाटली. त्यामुळे तो पुरता बिथरुन आणि बावचळून गेला होता. त्याला संतापही आला होता. संतापाच्या भरात त्याने पत्नीवर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. पत्नीला पेटवून दिल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी कशीबशी आग आटोक्यात आणली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, गोंदिया: शाळेत घुसून शिक्षिकेवर कुऱ्हाडीचे घाव; पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार)

दरम्यान, सोनाई पोलीस ठाण्यात पती शंकर दुर्गे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शंकर फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शंकरसोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेची माहिती मिळू शकली नाही. मात्र, पोलिसांनी ही महिला शोधून तिची चौकशी केल्यास शंकरचा ठावठिकाणा मिळू शकतो असा कयास व्यक्त केला जात आहे.