बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती
Pravin Pardeshi (Photo Credits: Twitter/ ANI)

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे (Brihinmumbai Mahanagar Palika) पूर्वायुक्त अजॉय मेहता (Ajoy Mehta)  यांची महाराष्ट्राचे  मुख्य सचिव(Maharashtra Chief Secretary)  पदी निवड झाल्यानंतर आता त्यांच्या जागी प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi)  यांची आयुक्त (Commissioner) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी घोषणा करताच मेहता यांनी आयुक्त पदाची सूत्रे प्रवीण यांच्याकडे सुपूर्त केली. यानंतर आज, 13 मे रोजी प्रवीण परदेशी यांनी कार्यलयाचा ताबा घेतला. 1985 साली आयएएस झालेले प्रवीण परदेशी हे यापूर्वी महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राज्य सरकार मध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्ह्णून कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून आयुक्त पदासाठी समोर येणाऱ्या नावांमध्ये परदेशी यांचे नाव अग्रेसर होते.

अजोय मेहता महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव

ANI ट्विट

आयुक्त पदी रुजू झाल्यावर माध्यमांशी संवाद साधताना येत्या काळात मुंबईत आपत्ती व्यवस्थापनासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून ते आपत्ती व्य्वथापक कार्यालयाशी जोडण्याचा प्रकल्प सुरु आहे त्याचा पुरेपूर वापर करण्याकडे भर देणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. तसेच मुंबई हे देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे शहर आहे इथल्या प्रादेशिक गरजा समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे देखील नवीन आयुक्तांनी सांगितले आहे.

प्रवीण परदेशी हे 2014 पासून सत्तेत असणाऱ्या फडणवीस यांच्या कार्यकारणीत अतिशय विश्वासू व कार्यतत्पर अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. केरळ पुरग्रस्तांना मदतीमुळे व लातूर भूकंपादरम्यान केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे नाव अधिक चर्चेत आले होते, यापूर्वी त्यांनी वनविभाग, नगरविकास ते महसूल खात्यात अनेक महत्वाची पदे बजावली आहेत.