Pravin Darekar & CM Uddhav Thackeray (Photo Credits: FB and PTI)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांना भेट दिल्याचे प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (BJP On Maharashtra Government: 'सरकार आहे की सर्कस?' सरकारच्या धोरणांवर प्रविण दरेकर यांची टीका)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मार्मिक वर्धापन दिन सोहळा पार पडत होता. प्रविण दरेकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी दोघांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना दरेकर म्हणाले की, "मुंबईतील सहकारी संस्थांच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. मला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर सहकारी संस्थांच्या वतीने माझा सत्कार समारंभ होता. त्यावेळी पुरपरिस्थिती असताना माझा सत्कार होण्यापेक्षा ते सत्कारणी लावूया. त्यानंतर 3 दिवसांत दीड कोटींचा निधी जमला. तो मुख्यमंत्र्यांकडे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे."

प्रविण दरेकर ट्विट्स:

त्याचबरोबर म्हाडाच्या मुंबईतील 56 वसाहतींकडून थकीत सेवाशुल्क आणि नवीन वाढीव बिलांच्या वसुलीचा म्हाडाचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन सादर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर कायम टीका करणारे आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय दरेकर यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.