
भाजपा नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना नेत्यांमधील वादयुद्ध हे काही नाही. दरम्यान मागील महिन्यांमध्ये ईडीच्या रडार वर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरूद्ध किरीट सौमय्यांनी अनेक गंभीर केले होते. यावरूनच आक्रमक झालेल्या प्रताप सरनाईकांनी देखील किरीट सौमय्यांच्या विरूद्ध ठाण्याच्या विशेष दिवाणी न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
किरीट सौमय्यांचे आरोप निराधार असल्याचं प्रताप सरनाईकांचं मत आहे. सौमय्यांच्या खोट्या विधानांवर त्यांनी माफी न मागितल्यास त्यांना मानहानीच्या दाव्याला सामोरी जावं लागेल असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते त्यानुसार आता प्रताप सरनाईक ठाणे न्यायालयात पोहचले आहे. परिणामी सोमय्या यांना प्रताप सरनाईक यांच्या विरूद्धच्या आरोपांवर कोर्टात उत्तरं द्यावी लागणार आहेत. नक्की वाचा: प्रताप सरनाईक यांना 23 ऑगस्ट पर्यंत दिलासा; बॉम्बे हाय कोर्टाकडून ईडीला तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे आदेश.
प्रताप सरनाईक विहंग गार्डन बिल्डिंग ठाणे अनधिकृत मजले / बांधकाम विरोधात किरीट सौमय्यांनी याचिका केली आहे. लोकायुक्ता कडे त्याची सुनावणी आहे. प्रताप सरनाईक यांनी 2002 मध्ये ठाणे येथे विहंग गार्डन इमारत बांधली. 5 मजले अनधिकृत बांधकाम. वापर परवाना OC मिळाले नाही. 114 फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केली. 2012 मध्ये डिमोलिशनचे, पाडण्याचे आदेश, ₹21 कोटीचा दंड भरला नाही. असा सौमय्यांचा दावा आहे.