Prashant Kishor (Photo Credits: ANI)

पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ( Assembly Election Results 2024) एका राज्याचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपने (BJP ) सत्ता मिळवली. त्यामुळे सहाजिकच विरोधकांना मोठाच धक्का बसला आहे. आता यावर वेगवेगळ्या पतळीवर विचारमंथनही सुरु आहे. अनेक अभ्यासक, विचारवंत प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, खरी लढाई विधनसभा निवडणुकीत नव्हे. देशासाठी खरी लढाई 2024 मध्ये असेल. त्या वेळी खरा निकाल पाहायला मिळेल, असे किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशासाठी खरी लढाई 2024 मध्ये असेल. साहेबांना हे माहिती आहे त्यामुळे देशातील नागरिकांची मानसीकता बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील जनता आणि विरोधक यांची मानसिक धारणा बनविण्याचा डाव आहे. विरोधकांनी या खोट्या जाळ्यात अडकू नये. या खोट्या कथेचा भाग होऊ नये, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Prashant Kishor On Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोणा एका व्यक्तीचा दैवी हक्क नाही; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा)

निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी म्हटले आहे की या निवडणुकीने 2024 चा निकाल निश्चित केला आहे. दरम्यान, काल म्हणजेच 10 मार्च रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. जनमताचा कौल पुढे आाल. या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता उर्वरीत चारही राज्यात भाजपने चांगली कामगिरी केली. या सर्व राज्यांमध्ये भाजप सरकार स्थापन करत आहे.