'नाचता येईना म्हणे अंगण वाकडे' दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी साधला भाजपवर निशाणा
A file image of Prakash Raj. | Image Courtesy: Facebook

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष (ShivSena NCP-Congress) एकत्र आल्यामुळे राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अधिक जागा मिळवल्या तरीदेखील ते राज्यात सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरले. भाजपला विरोधी बाकावर बसावे लागल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपची नामुष्की होत आहे. यातच दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (PrakaSh Raj) यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. याआधीही प्रकाश राज यांनी अनेकदा भाजपवर निशाणा साधला होता.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अवघ्या साडेतीन दिवसाचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळले आहे. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे अशा शब्दात प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सातत्याने ट्विट केले आहे. हे देखील वाचा-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होणार? राज्यपालपदी कलराज मिश्र यांची निवड होण्याची शक्यता

प्रकाश राज यांचे ट्विट-

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळवल्या होत्या तर, शिवसेना पक्षाला 56 मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीला 54 तर, काँग्रेसला 44 जागेवर बाजी मारली होती. महत्वाचे म्हणजे, भाजप-शिवसेना महायुतीने एकत्र निवडणूक लढवली असून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आणि 30 वर्षापासून असलेली त्यांची युती तुटली. याचाच फटका भाजपला बसला असल्याचे समजत आहे.