महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसला असल्याने भाजपा डॅमेज कंट्रोल करत असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते. राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याने राज्यपाल टीकेचे धनी झाले होते. महत्वाचे म्हणजे, भगतसिंह कोश्यारी यांनी पक्षपातीपणा केला आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच न्यायलायाकडून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे.
भगत सिंह यांनी पक्षपातीपणा केला असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. यामुळे काँग्रेसने कोश्यारी यांच्या कामगाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर कोश्यारी यांची तातडीने बदली करण्यात यावी, असे काँग्रेस नेते मनिष तिवारी म्हटले होते. जर कोश्यारी यांची बदली झाली तर, त्यांच्या जागेवर कलराज मित्र यांची निवड करण्यात येईल अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हे देखील वाचा-उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री; एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह या दिग्गज चेहऱ्यांना मिळू शकते संधी
कलराज मिश्र कोण आहेत ?
कलराज मिश्र यांना 22 जुलै रोजी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते असणारे कलराज मिश्र राज्य आणि केंद्रीय मंत्रीपदी राहिले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले असून, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.