प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणूक 2019 साठी उमेदवार यादी जाहीर; 37 नावांचा समावेश
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Has Released First List Of 37 Candidates For Upcoming Lok sabha Elections in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Vanchit Bahujan Aghadi Candidates List For Upcoming Lok sabha Elections 2019:  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक 2019 साठी आपली उमेदवार यादी केव्हा जाहीर करणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आंबेडकर यांनी ही यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) ही एकूण 37 लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभे करत आहे. ही यादी जाहीर करताना उमेदवाराच्या नावापुढे जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ही यादी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. यादीतील उमेदवार आणि त्यांच्या नावासमोरील जात पाहता आंबेडकर यांनी सर्व समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या (VBA)  माध्यमातून केल्याचे दिसते. मात्र, उमेदवाराची यादी जाहीर करताना त्यांची जात जाहीर करावी का? याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुनही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि पर्यायाने बहुजन वंचित आघडी ( Bahujan Vanchit Aghadi) यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सोबत घेऊ शकली नाही. त्यामुळे काँग्रेससोबत (Congress) असलेली संभाव्य आघाडी BVH तोडत आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे जाहीर केले होते. त्यानुसार आज (15 मार्च) वंचित बहुजन आघाडीने उमेदवार यादी जाहीर केली. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: पार्थ पवार, डॉ अमोल कोल्हे यांना NCP कडून लोकसभा निवडणूक 2019 चे तिकीट जाहीर, राष्ट्रवादी पक्षाची दुसरी मतदार यादी जाहीर)

उमेदवारींची नावे –

1. धनराज वंजारी -वर्धा

2. किरण रोडगे -रामटेक

3. एन.के.नान्हे – भडांरा-गोंदिया

4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)

5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर

6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम)

7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा

8. गुवणंत देवपारे-अमरावती

9.मोहन राठोड-हिंगोली

10.यशपाल भिंगे-नांदेड

11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी

12.विष्णू जाधव-बीड

13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद

14.राम गारकर-लातूर

15.अजंली बावीस्कर-जळगाव

16.नितीन कांडेलकर-रावेर

17. शरदचंद्र वानखेडे-जालना

18.सुमन कोळी-रायगड

19.अनिल जाधव-पुणे

20.नवनाथ पडळकर-बारामती

21.विजय मोरे-माढा

22.जयसिंग शेंडगे-सांगली

23.सहदेव एवळे-सातारा

24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

25.अरूणा माळी-कोल्हापूर

26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले

27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार

28.बापू बर्डे-दिंडोरी

29.पवन पवार-नाशिक

30.सुरेश पडवी-पालघर

31.ए.डी.सावंत-भिवंडी

32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे

33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण

34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)

35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई

36.राजाराम पाटील-मावळ

37.अरूण साबळे-शिर्डी

एएनआय पत्रकार अली शेख ट्विट

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, काँग्रेससोबत चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत. यापुढे काँग्रेससोबत या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे येत्या 15 तारखेला आम्ही राज्यातील सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर करतो आहोत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासोबत आघाडी करणार काय? असे विचारले असता आमची लढाई भाजप आणि शिवसेनेशी आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.